श्री. दिलीपभाऊ दादासाहेब चव्हाण यांच्याविषयी

वारुंजी ह्या छोटेखानी गावातून येऊन, संपूर्ण कराड परिसरात कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे श्री. दिलीपभाऊ चव्हाण. द कराड जनता बॅंकचे उपाध्यक्ष, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था विश्वस्त, पि डी पाटील प्रतिष्ठानचे सदस्य या बरोबरच अमित ऑटोमोबाईल व अमित फोर्स – कोल्हापूर चे निर्माते, धनलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलचे निर्मिती. श्री धनलक्ष्मी पतसंस्थाच्या माध्यमातून आर्थिक स्त्रोत निर्माण केला. श्री मारुतीबुवा मठ, कराडच्या माध्यमातून धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग केला. बळीराजा सुखी तर सर्व सुखी हा मूलमंत्र जोपासून समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी प्रत्यक्ष सहभाग.

 • द कराड जनता बॅंकचे उपाध्यक्ष
 • पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष
 • श्री शिवाजी शिक्षण संस्था विश्वस्त
 • पि डी पाटील प्रतिष्ठानचे सदस्य या बरोबरच
 • अमित ऑटोमोबाईल व अमित फोर्स – कोल्हापूर, धनलक्ष्मी फाउंडेशनचे निर्माते
श्री. अमित दिलीपभाऊ चव्हाण यांच्याविषयी

मोठा मित्र परिवार व मितभाषी स्वभाव या गुणांनी संपन्न असलेले अमित कराड परिसरात सुपरिचित आहेत. कन्स्ट्रक्शन व हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यदायी सेवा, फार्मसी व एमबीए कॉलेजच्या माध्यमातून युवा पिढीला मार्गदर्शन करण्यात अमित नेहमीच अग्रेसर असतात.

 • अमित ऑटोमोबाईल व अमित फोर्सचे काम पाहत एमबीए पदवीधर
 • राजकीय क्षितिजावरील एक नवीन उमदे नेतृत्व.
 • सूर्या बिल्डर्स या नावाखाली आजपर्यंत ४ कमर्शियल व ७ रेसिडेनशियल प्रकल्पांची निर्मिती.
 • हिराई गोल्डन सिटी सारख्या प्रतिष्ठित प्रकल्पाच्या डेव्हलपमेंटचं काम सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे.
श्री. विक्रम कोटणीस यांच्याविषयी

मुळचे कराडचे असल्यामुळे, विक्रम ह्यांचं कराडशी एक अतूट नातं आहे. त्यांचे आजोबा – श्री. राजाराम कोटणीस हे कराडचे एक प्रतिष्ठित उद्योजक, विचारवंत आणि समाजसेवक होते. त्यांनी उभारलेला कराडचा ‘पहिला’ बजेट होम प्रकल्प ‘प्रकाश नगर’ हा आज कराडच्या सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. तसच त्यांनी गव्हरमेंट इंजिनियरिंग कॉलेज,कृष्णा हॉस्पिटल आणि कोयना वसाहत सारखे प्रतिष्ठित प्रकल्पही साकारले आहेत.

 • विक्रम कोटणीस हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या अमुरा मार्केटिंग टेक्नॉलॉजि ह्या डिजिटल कंपनीचे संस्थापक आहेत.
 • त्यांनी ह्याआधी सन मायक्रोसिस्टिम्स, एएमडी आणि लेंडिंग ट्री ह्यासारख्या जगविख्यात कंपन्यांकरीता काम केले आहे.
 • अमेरिकेमध्ये भरघोस यश मिळाल्यावर त्यांनी भारतात परतुन अॅक्झीलॉन आणि अमुरा ह्या कंपन्यांची स्थापना केली.

हाच वारसा पुढे नेत, कराडला जागतिक स्तराचे प्रकल्प देऊन, कराडला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणं, हाच त्यांचा एकमेव ध्येय आहे. आणि ह्याची सुरुवात राज नक्षत्र पासून होईल अशी त्यांना खात्री आहे